GM Report September 2025 Hero Image

सभेचा वृत्तांत, सप्टेंबर - २०२५


📝 वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त

सन्माननीय सभासद,

सिध्दिविनायक कॉ. ऑप. हौ. सोसायटीची वार्षिक सर्व साधारण सभा दिनांक २८.०९.२०२५ रोजी अवकाळी पावसाळी वातावरण असल्यामुळे संध्याकाळी ५:०० वाजता विलंबाने सुरु करण्यात आली. त्यात ६९ घरमालक उपस्थित होते. सभेस उशीर झाल्यामुळे सचिव श्री. राहूल वाघमारे यांनी दिलगीरी व्यक्त केली. त्यानंतर सभेचे काम श्री. सचिन दळवी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे सुचित केले.

सुचक : श्री राहूल वाघमारे

अनुमोदक : श्री विलास तोरस्कर

त्यानंतर विषय पत्रिकेप्रमाणे कामकाजास मुद्दयानिहाय श्री. राहूल वाघमारे यांनी सभेस सुरवात केली.

विषय क्र. १ : दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण करणे.

सभेची सुरवात होताच सोसायटीतील सर्व दिवंगतांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.

विषय क्र. २ : नवनिर्वाचीत व्यवस्थापक कमिटीचे स्वागत करणे.

सोसायटीतील निवडणूक प्रक्रियेत एकूण २५ निवडणूक सभासदापैकी १३ सभासद विजयी झाल्याने त्यांचे स्वागत ठराव मांडण्यात आला. त्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.

विषय क्र. ३ : दि.१३.१०.२०२४ रोजी झालेल्या सभेचे इत्तिवृत्त वाचून कायम करणे.

सदरच्या सभेचे इतिवृत्त श्री राहूल वाघमारे यांनी सविस्तर पणे वाचून दाखवले व त्याबाबतची पुर्तता माहिती सभेत दिली. ठराव सर्वानुमते मंजूरकरण्यात आला.

सुचक : दिपक कोळी

अनुमोदक : श्री पी.आर.महाडिक

विषय क्र. ४ : असोसिएशनचे गृहनिर्माण संस्थेत रुपांतर झाल्यावर २०२४ - २०२५ वर्षातील नविन झालेल्या सभासदांच्या नावास मंजूरी घेणे.

असोसिएशनचे गृहनिर्माण संस्थेत रुपांतर झाल्यावर २०२४- २०२५ वर्षातील नविन झालेल्या सभासदांच्या नावास मंजूरी देण्यात आली. असोसिएट मेंबर म्हणून श्री. गणेश शांताराम मोंडकर बी-१०/०२/१:१ यांच्या नावास दि. १२.०७.२०२५ रोजीच्या मासिक सभेने मंजुरी दिल्यावर त्यांच्या नावाचे वाचन करण्यात आले.

क्र.सभासदाचे नावसदनिका क्रमांक
1कुमारी आशा नाईकबी/१०/५/०:४
2श्री निवास पुतमणीबी/१०/९/३:३
3श्रीमती मिनाक्षी नटराजनबी/१०/६/२:३
4श्री नंदू केदारे निर्मळकरबी/१०/५/२:४
5श्री सागर गंभीरबी/१०/४/३:१
6श्री मोहम्मद कलावे मोईद्दिनबी/१०/२/३:१
7श्रीमती डी. पद्मा प्रसादबी/१०/३/२:३
8श्रीमती कमला मैडनबी/१०/६/१:४
9श्री प्रमोद बळीराम पालांडेबी/१०/७/३:२
10श्री किरण गणेश शेट्टीबी/१०/८/३:३
11श्री दिगंबर राणेबी/१०/५/०:१
12श्री सुभाष गचांडेबी/१०/६/१:३

या सर्वांचे मेंबरशीप नावाचे वाचन करण्यात आले, त्या सर्वानुमते मंजुरी देण्यात आलेली आहे.

सुचक : श्री दत्तात्रय राजदेव

अनुमोदक : श्री प्रभाकर तावडे

विषय क्र. ५ : हंगामी कमीटीच्या कार्यकाळात आर्थिक वर्ष ०१.०४.२०२४ ते ०८.०८.२०२४ वं ०९.०८.२०२४ ते ३१.०३.२०२५ पर्यंत वैधानिक लेखा परिक्षण झालेल्या ताळेबंदास मंजूरी देणे.

सदरचा असोसिएशनचा कार्यकाळ ०१.०४.२०२४ ते ०८.०८.२०२४ व. असोसिएशनचे गृहनिर्माण संस्थेत रुपांतर झाल्यावर दि.०९.०८.२०२४ ते ३१.०३.२०२५ पर्यंतच्या वैधानिक ताळेबंदाचे वाचन सोसायटीचे खजिनदार श्री महादेव मोडक यानी केले व त्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. आणि ऑडिट रिपोर्ट सादर न करता निवडणूक घेऊ शकतो असे स्पष्टीकरण देण्यात आले.

सुचक : श्री पी.आर. महाडिक

अनुमोदक : श्री दत्तात्रय राजदेव

विषय क्र. ६ : सन २०२५ २०२६ आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखा परिक्षकाची नेमणूक करणे व त्यांच्या मानधनास मंजुरी देणे.

सन २०२५ - २०२६ आर्थिक वर्षासाठी अंतर्गत लेखा परिक्षक म्हणून श्री. कृष्णा राणे (मॅनेज कन्सलटन्सी) यांचीच निवड करण्यात आलेली आहे व सोसायटीचे काम त्यांच्या कन्सलटंसी कडून करुन घेण्याचे ठरले आहे. व त्यासाठी श्री किरण मारु हे वैधानिक लेखा परिक्षक असतील. त्यांच्या मानधनाची रक्कम खालील प्रमाणे असेल.

सोसायटीच्या मेंबर प्रमाणे नोंदी: प्रती मेंबर रु. २५/-

लेखा परिक्षण चार्जेस: प्रती मेंबर रु. १००/-

इतर नोंदी आय. जे. रजिस्टर व शेअर्स नोमीनेशन इ, प्रती मेंबर रु.१००/- एकरक्कमी

सुचक : श्री सनल कुमार

अनुमोदक : श्री सागर गंभीर

विषय क्र. ७ : हंगामी कमीटीने तयार केलेली भाग पत्रे (शेअर्स सर्टिफिकेट) सभासदांना वितरीत करणे त्याच प्रमाणे नोमीनेशन फॉर्मचे वितरण करणे.

सोसायटीकडे भाग पत्रे (शेअर्स सर्टिफिकेट) तयार असून काही सभासदांनी घेणे सुरुवात केलेली आहे. त्याप्रमाणे नॉमीनेशन फॉर्मस सुध्दा सोसायटी कार्यालयात उपलब्ध असून घरमालकांनी कार्यालयीन वेळेत रु. २५/-फॉर्म फी भरुन घेऊन जावेत. सदरचे फॉर्मस तीन प्रती मध्ये आहेत.

सुचक : श्री महादेव मोडक

अनुमोदक : श्री रविंद्र कुकडे

विषय क्र. ८ : संस्थेच्या कामकाजात उद्भवणा-या अडचणी साठी व कायदेशीर सल्ल्यासाठी कायदेशीर सल्लागाराची नियुक्ती करणे व त्यांचे मानधन ठरविणे.

सदर बाबतीत कमीटीने कायदेशीर सल्लगाराची नियुक्ती करण्यासाठी पेपर मध्ये जाहिरात देवून कोटेशन प्राप्त झाल्यावर त्यांचा अनुभव / अर्हता / कामाचे निकष पाहून निर्णय घेण्याचे ठरले व त्या प्रमाणे मानधन ठरवावे.

सुचक : पी.पी.म्हात्रे

अनुमोदक : श्री विश्वनाथ सावंत

विषय क्र. ९ : सोसायटीच्या पुर्नविकास आणि पी.एम.सी. सल्लागार (PROJECT MANAGEMENT CONSULTANT) बद्दल चर्चा करुन प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्ती करण्याबाबत सभेची मंजूरी घेणे.

सदर सोसायटीच्या पुर्नविकास आणि पी.एम.सी. बद्दल स्वतंत्र स्पेशल सर्व साधारण सभा (SGM) मध्ये चर्चा करुन निर्णय घेण्याचे ठरलेले आहे.

सुचक : श्री सागर गंभीर

अनुमोदक : रविंद्र कुकडे

विषय क्र.१० : अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणा-या विषयांवर चर्चा करणे.

१) सध्याच्या ताळेबंदा प्रमाणे सोसायटीचा ताळमेल जमा खर्च, आर्थिक स्थिती महागाई वाढीव मुळे जेम तेम भागविला जात आहे. जमे पेक्षा खर्च वाढलेला आहे. त्यासाठी मेटेनन्स फी वाढ करणे क्रम प्राप्त आहे. असे श्री राहूल वाघमारे यांनी सुचविले त्याप्रमाणे बैठकित बरीच चर्चा होऊन मेटेनन्स रु.३००/- वरुन रु.४००/- ऑक्टोबर २०२५पासून करण्याबाबतचा सर्वानुमते निर्णय झालेला आहे. त्याचे वर्गीकरण लेखा परीक्षक यांचेकडून करुन घेण्याचे ठरलेले आहे. त्याचप्रमाणे भाडेकरू कडून (non occupancy charges) रू १०००/- घेत आहोत ते न घेता नियमाप्रमाणे मेन्टेनन्सच्या १०% टक्के घेतले जातील असे श्री महादेव मोडक यांनी सांगितले.

सुचक : श्री अशोक ठाकरे

अनुमादक : श्री दत्तात्रय राजदेव

२) प्रत्येक मिटींगचे चित्रीकरण करावे हा विषय चर्चेत आल्यावर विडीओ चित्रीकरणाचा खर्च अवाढव्य असून प्रत्येक मिटींगचा खर्च सोसायटीला परवडणारा नसल्याचे सभासदामधून सुचविण्यात आले. त्यासाठी ज्या (SGM) मध्ये पीएमसी (PMC) किंवा बिल्डर बरोबर संवाद या सारख्या मिटींगचे विडीओ चित्रीकरण ठराव वगैरे करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे. त्यास सर्वांनी मंजुरी दिलेली आहे.

३) सोसायटीचा १४४ घरमालकांचा व्हॉटसअॅप ग्रुप असावा असे श्री. सुनिल गुप्ता यांनी सुचविले त्यास अध्यक्ष श्री दळवी यांनी उत्तर दिले कि, सोसायटीच्या ग्रुप मध्ये आपण वारंवार सभासदांना समाविष्ठ करीत आहोत आणि यापुढे करित राहू एखादा कोणी सभासद राहिला असेल त्यांना विचारणा करुन समाविष्ठ करुन घ्यावे असे श्री. सचिन दळवी यांनी सांगितले आणि सध्या कॉम्प्युटर नसल्याने सोसायटीचा ईमेल आयडी (Email ID) ओपन करू शकत नाही पूढे या गोष्टीवर विचार करून निर्णय घेऊ.

४) बिल्डींग भिंतीवर आलेली रोपटी काढण्यात यावी, त्यासाठी बिल्डींग क्र.३ मधून ४ घरमालकाचे लेखी अर्ज आलेले आहेत. बिल्डींगवर येणारी रोपटी / झाडे वारंवार सोसायटी तर्फे काढलेली आहेत. परंतू बिल्डींग मधील ड्रेनेज पाईप गळती मुळे झाडे पुनःश्च उगवतात, त्यासाठी सदरची पाईप लाईन घरमालकांनी बदलून घेतल्यास हा प्रश्न उद्भवणार नाही असे श्री. राहूल वाघमारे यांनीं सुचविले. या संदर्भात बिल्डींग क्र.८ च्या घरमालकांनी पाईप बदली स्वः खर्चाने केल्यामुळे प्रश्न निकाली काढलेला आहे असे श्री सचिन दळवी यांनी सुचविले.

५) उंदिर पाईपलाईन वरुन चढू नयेत म्हणून पाईपला पत्रा लावणे बाबतचा निर्णय सर्वानुमते झालेला आहे.

सुचक : श्री विश्वनाथ सावंत

अनुमोदक : श्री रविंद्र कुकडे

६) वार्षिक सर्वसाधारण सभा सकाळच्या वेळेत घेण्यात यावी असे श्री. म्हात्रे यांनी सुचविले यांस श्रीमती शमा भोगटे यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला. सकाळच्या वेळेत घरच्या कामामुळे महिलांना वेळ देता येणार नाही, दुपारची वेळ योग्य आहे त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आलेली आहे.

७) कोणत्या सभेत निवडणुकीचा ठराव संमत करण्यात आला याबाबत माहिती दयावी, अशी विचारणा श्री बि.बि. खैरनार यांनी केल्यावर सदरच्या बाबतीत संमत झालेल्या ठरावाची प्रत आपल्या माहिती साठी देण्यात येईल असे श्री. राहूल वाघमारे यांनी सांगितले.

८) आम्ही देत असलेल्या पत्र व्यवहाराची पोच देण्यात येत नाही अशी विचारणा श्री. सुनिल गुप्ता यांनी केली असता, अजून सोसायटीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली नाहि त्याच प्रमाणे पत्र व्यवहाराची प्रत उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविण्यात येत असल्यामुळे आलेल्या पत्रावर कार्यकारीणी समिती मध्ये चर्चा केल्यानंतर किंवा रितसर सल्लागाराशी चर्चा करुन देण्याचे ठरले आहे.

सुचक : श्री सुनिल गुप्ता

अनुमोदक : श्री महादेव मोडक

९) लिज डिड आणि सप्लीमेंटरी लिज डिड यातील फरक काय अशी विचारणा श्री. विश्वनाथ सावंत यांनी केली असता त्यास श्री वाघमारे यांनी माहिती देऊन त्यांच्या शंकेचे निरसन केलेले आहे.

१०) श्री शैलेश करगुटकर आर्किटेक्ट यांनी बिल्डींग प्लॅन प्रमाणे किती चटई क्षेत्र मिळेल या बाबत आपण मला अनुमती दिल्यास फिजीबल रिपोर्ट प्रमाणे तयार करुन माहिती देईन असे सांगितले. त्यास सर्वानुमते सहमती दिलेली आहे.

११) नवी मुबंई महानगरपालिके कडून स्ट्रकचरल ऑडिट करुन घेण्याबाबत पत्र जुन २०२५ मध्ये आलेले आहे. त्याबाबतचा विषय चर्चेला आल्यावर श्री. खानविलकर यांनी असे पत्र व्यवहार इतर सोसायटीला सुध्दा वारंवार येत असल्याचे सांगितले व सध्या आपण पुढील पुर्नविकासाबाबत विचार करुया असे सुचविले.

सुचक : श्री भाऊराव खानविलकर

अनुमोदक : सर्वानुमते मंजूर

१२) कॅमेरेची रेकॉर्डीग जास्त दिवस साठवणुक करण्यासाठी ऑफीसमध्ये कॉम्प्युटर व्यवस्था करावी अशी सुचना श्री विश्वनाथ सावंत यांनी केली त्याबाबत निर्णय सोसायटीच्या मासिक बैठकित विचार करून निर्णय घेण्याबाबत ठरलेले आहे.

१३) सोसायटी बनविण्यासाठी मेंबर कडून घेतलेल्या रक्कमेची माहिती बाबत ३५०० x १४४ = ५,०४,०००/- रुपये जमा होणे आवश्यक होते त्याऐवजी ताळेबंदा मध्ये रु.४,५७,०००/- रुपये जमा झाल्याचे दिसत आहे. अजून किती मेंबर कडून रक्कम येणे बाकी आहे याबाबत श्री पी. पी. म्हात्रे यांनी विचारणा केली त्यास खजिनदार श्री मोडक यांनी त्याबाबत माहिती सविस्तर देण्यात येईल असे सांगितले, त्याप्रमाणे श्री मोडक यांनी श्री म्हात्रे यांच्याशी भ्रमणध्वनी वरुन संपर्क करुन खुलासा केलेला आहे. सदरचा ताळेबंद अहवाल हा दिनांक ३१.०३.२०२५ कालावधी पर्यंतचा आहे. उर्वरित माहिती पुढील वर्षीच्या आर्थिक वर्षा मध्ये समाविष्ठ होईल. सभासदाकडून रुपये १७,५००/- रक्कम येणे बाकी आहे. त्याबाबत त्यांच्या प्रश्नाचे निरसन झालेले आहे. सोसायटीच्या बँक अकाऊंट मध्ये ठेवलेली एफ डी (F.D.) कश्या करिता आहे अशी विचारणा श्री म्हात्रे यांनी केल्यावर सोसायटीच्या सी.एच.एस. (CHS) आणि सप्लीमेंटरी लिज डिड साठी प्रत्येक सभासदांकडून फक्त रुपये ३५००/- घेऊन उर्वरित झालेला खर्च सोसायटीच्या फंडातून केलेला आहे. त्यामुळे हि राखीव रक्कम ठेवल्याने प्रत्येक सभासदांवर सी.एच.एस. (CHS) व लिज डिड साठी आलेल्या कामाचा भूदंड कमी झाला असे स्पष्टीकरण अध्यक्ष श्री सचिन दळवी यांनी दिले. अशा प्रकारे वरिल सर्व बाबींवर मिटींग मध्ये अत्यंत चांगल्याप्रकारे चर्चा झालेली आहे. त्यानंतर अध्यक्षांनी सर्व उपस्थित घरमालकांचे पावसाळी वातावरण असुनही हजर राहिल्याबाबत आभार मानले व सभेचे कामकाज संपल्याचे जाहिर केले.

धन्यवाद

आपले नम्र,

सिध्दिविनायक को. ऑप. हौसींग सोसायटी