
सभेचा वृत्तांत, नोव्हेंबर - २०२५
📢 सभेची नोटीस
सर्व सभासदांना कळविण्यात येते की, आपल्या संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा दिनांक ३०/११/२०२५ रोजी ठिक सायंकाळी ०४:०० वाजता सोसायटी ऑफिस जवळील आवारात आयोजित केलेली आहे. सर्व सभासदांनी उपस्थित राहून सहकार्य करावे हि विनंती.
असोसिएशन / संस्थेचा मागिल सभेतील चर्चेचा आढावा :
संस्थेचे पुर्वीचे स्वरुप असोसिएशन असे असताना, असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेतील इमारत क्रमांक बी/१०/१ ते ९ च्या पुनर्विकास करण्याबाबत प्राथमिक निर्णय घेण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार हंगामी कार्यकारीनी कमिटीने पुनर्विकासाच्या दृष्टीने सर्व शक्यता आणि अशक्यता तपासून सदर कार्यवाही पुढे नेण्याच्या दृष्टीने प्रथम असोसिएशनचे रुपांतर गृहनिर्माण संस्थेत करण्याला प्राधान्य दिले, सदर प्रक्रियेत सहा ते सात महिने गेले. सदर गृहनिर्माण संस्था नोंदणीची प्रक्रिया सुरु असल्याने पुनर्विकासाच्या प्रक्रियेला अपेक्षित गती मिळू शकली नाही.
दरम्यान संस्थेची सोसायटी म्हणून नोंदणी पूर्ण झाल्यानंतर नव्याने कार्यकारिणी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारिणी समितीने दिनांक ०२/११/२०२५ रोजी झालेल्या बैठकित असोसिएशनच्या दिनांक ०१/०९/२०२४ रोजीच्या सभेत इमारतींच्या पुनर्विकास करण्याबाबत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने पुनर्विकासाबाबतच्या प्रक्रियेचा सर्वांगीण आढावा घेऊन पुढिल प्रक्रिया सुरु करण्याचे निश्चित केले, जेणेकरुन संस्थेच्या सभासदांसमोर पुनर्विकासाचा निर्णय घेण्याबाबत चर्चा करताना कार्यकारिणी कमिटी देखील सभासदांच्या प्रश्नांना / शकांना उचित खुलासा देण्यास समर्थ राहिल, त्यानुसार :-
-
पुनर्विकासाकरिता कायदेशीर सल्लागारांची (LEGAL ADVISOR) नियुक्ती करण्यासाठी पेपर मध्ये जाहिरात देऊन विविध तज्ञांकडून कोटेशन मागविण्यात आले.
-
प्राप्त कोटेशनची तुलना करुन योग्य कायदेशीर सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
-
नियुक्त कायदेशीर सल्लागारांनी शासनाच्या ४ जुलै २०१९ च्या ठरावातील तरतुदींनुसार काही विषयांवर विशेष सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे आवश्यक असल्याचे सुचित केले आहे.
-
त्यानुसार पुनर्विकासासंबधी महत्वाचे निर्णय विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करणे आवश्यक आहे. वरिल सर्व पार्श्वभूमीवर ही विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येत आहे.
सभेपुढील विषय :
१. सोसायटीच्या पुनर्विकासासंबधी (REDEVOLOPMENT) चर्चा करुन प्राथमिक निर्णय घेणे तसेच सोसायटीच्या पुनर्विकासाबद्दल ठराव मंजूर करणेबाबत आणि समंतीपत्र घेण्याबाबत ( फोटो /आधारकार्ड कॉपी आवश्यक)
२. कार्यकारिणी समितीने निवड व नियुक्त केलेल्या कायदेशीर सल्लागारांच्या (LEGAL ADVISOR) नियुक्तीस मंजूरी देणे व त्यांचा परिचय सभेसमोर ठेवणे.
३. सोसायटीतील सर्व इमारतीचे दिनांकच्या ४.०७.२०१९ च्या शासन निर्णयानुसार आणि सोसायटी नियमावली/बायलॉज (BYE-LAWS) नुसार सोसायटीच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट (STRUCTURAL AUDIT करुन घेण्यास सभेची मंजूरी घेणे जेणेकरुन शासन निर्णय युडीसीपीआर २००० (UDCPR २०००) मधील तरतुदीनुसार पुनर्विकास प्रक्रियेत अधिक लाभ घेता येईल.
४. सोसायटीच्या पुनर्विकासासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार पीएमसी (PMC) नेमणुकीबाबत ठराव मंजूर करण्याबाबत चर्चा करुन निर्णय घेणे.
५. सभेत पुनर्विकास संदर्भात होणा-या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबतचे अधिकार कार्यकारिणी कमिटीला देण्याबाबत चर्चा करुन निर्णय घेणे. (विकासक नियुक्ती वगळून)
आपले नम्र
सिध्दिविनायक को. ऑप. हौसींग सोसायटी
सुचना :
१. गणसंख्ये अभावी सभा तहकूब झाल्यास, त्याच दिवशी, त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर सभा घेण्यात येईल.
२. सभेत फक्त सभासद असलेले सदनिकाधारक उपस्थित राहू शकतील. सभासदांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. सभेस येताना स्वः तचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. ३. संमती पत्रा बरोबर लागणा-या दस्ताएवज (दोन पासपोर्ट फोटो / आधारकार्डकॉपी / रेशरनकार्ड कॉपी / लाईट बिल कॉपी / सिडको अलॉटमेंट लेटर / डिड ऑफ अपार्टमेंट)
End of Notice
📝 सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त
सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था यांची विशेष सर्वसाधारण सभा रविवार दि. ३०/११/२०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता सोसायटीच्या ऑफिस समोरील प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. सदर सभा गणसंख्येअभावी अर्धा तास तहकूब करण्यात आली आणि त्यानंतर त्याच ठिकाणी सायंकाळी ४.३० वाजता उपस्थित असलेल्या कोरममध्ये पुन्हा सुरु करण्यात आली. सचिव श्री. राहूल वाघमारे यांनी सभेचे कामकाज करण्यासाठी अध्यक्षांची निवड करण्यात यावी अशी सूचना सभेला केली. त्यानुसार सभेने श्री. सचिन दळवी यांची सभेचे अध्यक्ष म्हणून निवड करावी असे सुचवले त्यास सर्वानुमते मंजुरी दिल्यानंतर श्री. सचिन दळवी यांनी सभेचे अध्यक्षपद स्वीकारले आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज सुरु करण्यात आले.
विषय क्र. १ सोसायटीच्या पुनर्विकासासाठी (Redevelopment) चर्चा करून ठराव मंजूर करणे आणि त्यासाठी संमतीपत्र घेण्याबाबत.
चर्चा विषय क्र. १ च्या अनुषगाने चर्चा करत असताना सचिव श्री. राहूल वाघमारे यांनी खुलासा केला कि, आता आपल्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत. दीड वर्षांपूर्वी इमारतींचा पुनर्विकास करावा अशी येथील रहिवाश्यांची मागणी होती मात्र आधी असोसिएशनचे रुपांतर सहकारी गृहनिर्माण संस्थेत करण्यात यावे आणि मग पुनर्विकास प्रकियेला सुरुवात करावी असे ठरविण्यात आले होते. आता आपल्या असोसिएशनचे रुपांतर गृहनिर्माण संस्थेत होवून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे, तेव्हा हंगामी कार्यकारिणी कमिटीने कार्यरत होती आता रितसर निवडणूक होवून कमिटीची नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हा आता इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत विशेष सर्वसाधारण सभेने (SGM) निर्णय घ्यावा. याबाबत सखोल चर्चा करताना आपल्या आजूबाजूच्या सोसायटीमधील इमारतींचा पुनर्विकास होत आहे आणि आपण अद्याप सुरुवात देखील केलेली नाही, तसेच घरांची होणारी पडझड आणि आयुर्मान अधिक झालेले आहे अशी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आल्यानंतर सभेने एकमताने इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय मंजूर केला.
**ठराव क्र. १ ** ठराव करण्यात येत आहे कि, आजची सभा इमारतींचा पुनर्विकास (Redevelopment) करण्यासाठी एकमताने प्राथमिक निर्णयास मंजुरी देत आहे.
सूचक श्री. विक्रम बागायतकर
अनुमोदक - श्री. गणेश शेरीगर
ठराव क्र. १ सर्वानुमते मंजूर.
विषय क्र. २. कार्यकारिणी समितीने नियुक्त केलेल्या कायदेशीर सल्लागार (legal advisor) नियुक्तीस मंजुरी देणे.
चर्चा - संस्थेच्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या दृष्टीने भविष्यात अनेक कायदेशीर अडचणी येवू शकतात, त्याकरिता उचित कायदेशीर मार्गदर्शन मिळावे म्हणून पुनर्विकास (Redevelopment) प्रक्रियेतील अनुभवी कायदेशीर सल्लागार (legal advisor) श्री अभिनय सिंग यांची नियुक्ती कार्यकारिणी समितीने मागील दि. २८/०९/२०२५ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (AGM) विषय आणि ठराव क्र.८ प्रमाणे केली आहे अशी माहिती सचिव श्री राहूल वाघमारे यांनी उपस्थित सभेला देताना सांगितले कि, श्री अभिनय सिंग यांना पुनर्विकास प्रकियेत मागील १५ वर्षांचा अनुभव आहे आणि त्यातील प्रत्येक बाबीचे उत्तम ज्ञान आहे आणि त्यांनी संस्थेचे कायदेशीर सल्लगार (legal advisor) अभिनय सिंग यांना स्वतःचा परिचय उपस्थित सभेस करून देण्याबाबत विनंती केली. त्यानुसार कायदेशीर सल्लागार (legal advisor) अभिनय सिंग यांनी देखील उपस्थित सभेला आपला परिचय करून देताना आपल्या कामांचा अनुभव सांगितला आणि पुनर्विकास (Redevelopment) प्रक्रियेतील कायदेशीर प्रक्रियेचा आढावा मांडला. त्याबाबत सभेचे समाधान झाल्यामुळे सभेने एकमताने संस्थेच्या पुनर्विकास (Redevelopment) प्रक्रियेचे कायदेशीर सल्लागार (legal advisor) म्हणून अभिनय सिंग यांच्या नियुक्तीस मंजुरी दिली.
ठराव क्रमांक २ ठराव करण्यात येत आहे कि, आजची सभा संस्थेच्या इमारतींच्या पुनर्विकास (Redevelopment) प्रकल्पाचे कायदेशीर सल्लागार (legal advisor) म्हणून अभिनय सिंग यांच्या नियुक्तीस सर्वानुमते मंजुरी देत आहे.
सूबक - श्री किरण नलावडे
अनुमोदक - श्री शिध्दोधन माहीते
ठराव क्र. २ सर्वानुमते मंजूर.
विषय क्र. ३ - इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करून करण्याबाबत. (Structural Audit)
चर्चा – इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट (Structural Audit) का करून घ्यावे याबाबत मार्गदर्शन करताना कायदेशीर सल्लागार (legal advisor) अभिनय सिंग आणि इतर कार्यकारिणी कमिटी सदस्यांनी उपस्थित सभेस सांगितले कि, आपल्या इमारतींचे आयुर्मान आता तीस वर्षांहून अधिक झाले आहे. आणि आपण पुनर्विकास (Redevelopment) करण्याचा प्राथमिक निर्णय मंजूर केलेला आहे. तसेच आता छताचे प्लास्टर कोसळणे, भिंतीना ओलव गिलावा येणे, पावसाळ्यात घराला गळती लागणे अश्या विविध समस्या सातत्याने भेडसावू लागल्या आहेत. तसेच मनपाने (NMMC) देखील इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट (Structural Audit) स्वखर्चाने करून घ्यावे अशी नोटीस दिलेली आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास आणि त्यात जीवित व वित्तहानी झाल्यास मनपा (NMMC) प्रशासन कायदेशीररीत्या संस्थेला आणि तिच्या कार्यकारिणी कमिटीला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करू शकते. आणि त्यामुळे बाय लॉज (Bye-laws) प्रमाणे इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट (Structural Audit) करून घेणे आवश्यक आहे. या खुलाश्यामुळे उपस्थित सभेचे समाधान झाल्याने सभेने सर्वानुमते इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट (Structural Audit) शासकीय किंवा प्रमाणित संस्थेकडून करून घेण्यास एकमताने मंजुरी दिली.
ठराव क्र. ३ ठराव करण्यात येत आहे कि, इमातींच्या पुनर्विकासाच्या आणि सोसायटी बाय लॉजच्या अनुशंगाने संस्थेच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट शासकीय किंवा प्रमाणित संस्थेकडून करून घेण्यात यावे.
सूचक - श्री. भाऊराव खानविलकर
अनुमोदक श्री. गणेश शेट्टी
ठराव क्र. ३ सर्वानुमते मंजूर
विषय क्र. ४ सोसायटीच्या पुनर्विकासासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार पीएमसी (PMC) नेमणुकीबाबत ठराव मंजूर करण्याबाबत.
चर्चा - संस्थेच्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी कायद्यानुसार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची पीएमसी (PMC) नियुक्ती करणे बंधनकारक आहे अशी माहिती सभेस उपस्थित असलेले कायदेशीर सल्लागार (legal advisor) अभिनय सिंग यांनी दिली. तसेच कमीतकमी ३ पीएमसी (PMC) कडून त्यासाठी निविदा मागविणे आवश्यक आहे असे नमूद केले. त्यानुसार पीएमसी (PMC) नियुक्तीसाठी वर्तमान पत्रात जाहिरात देवून निविदा प्राप्त झाल्यावर संस्थेच्या कार्यलयात उपस्थित असणाऱ्या सर्व सभासदांच्या समोर सदर निविदा उघडण्यात येतील. असे सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
ठराव क्र. ४ - ठराव करण्यात येत आहे कि, संस्थेच्या इमातींचा पुनर्विकास (Redevelopment) करण्यासाठी पीएमसी (PMC) ची नियुक्ती करण्याकरिता वर्तमान पत्रात जाहिरात देवून निविदा मागविण्यात येतील आणि त्या प्राप्त झालेल्या निविदा संस्थेच्या कार्यालयात सर्व सभासदांच्या समोर उघडण्यात येतील.
सूचक श्री. दत्तात्रय राजदेव
अनुमोदक - श्री प्रकाश मेहेर
ठराव क्र. ४ सर्वानुमते मंजूर.
विषय क्र. ५ पुनर्विकास (Redevelopment) संदर्भात होणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबतचे अधिकार कार्यकारिणी कमिटीला देण्याबाबत (विकासक नियुक्ती वगळून) चर्चा करून निर्णय घेणे.
चर्चा - संस्थेने पुनर्विकास (Redevelopment) करण्याचा प्राथमिक निर्णय घेतलेला आहे. त्या अनुशंगाने कायदेशीर सल्लागार यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच पीएमसी (PMC) नियुक्तीसह इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट (Structural Audit) करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र पुनर्विकासाच्या एकंदरीत प्रक्रियेत अनेक शासकीय कार्यालये आणि प्राधिकरणे यांच्या परवानग्या घ्याव्या लागतात आणि त्यासाठी अनेक दस्तावेजांची पूर्तता प्रत्यक्ष संबंधित कार्यालयात उपस्थित राहून करावी लागते, त्यासाठी संस्थेच्या वतीने अधिकृत घटकांना आवश्यक असल्यास स्वाक्षऱ्या कराव्या लागतात. त्यामुळे पुनर्विकासाची (Redevelopment) प्रक्रिया प्रभावी पद्धतीने आणि गतीने तसेच विना अडथळा पुढे नेण्यासाठी विकासक नियुक्ती वगळून इतर आवश्यक कार्यवाही करण्याचे अधिकार संस्थेच्या वतीने कार्यकारिणी कमिटीला देणे आवश्यक आहे त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि प्रक्रिया पुढे नेण्यास गती मिळेल. असा खुलासा कायदेशीर सल्लागार (legal advisor) अभिनय सिंग यांनी उपस्थित सभेसमोर केला. याबावत सभेचे समाधान झाल्यामुळे सभेने एकमताने (विकासक नियुक्ती वगळून) पुनर्विकासाच्या कामात योग्य ती गती आणि घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याबाबतचे अधिकार कार्यकारिणी कमिटीला दिले.
ठराव क्र. ५ ठराव करण्यात येत आहे कि, आजची सभा (विकासक नियुक्ती वगळून) पुनर्विकासाच्या (Redevelopment) कामात योग्य ती गती आणि घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याबाबतचे अधिकार कार्यकारिणी कमिटीला देत आहे.
सूचक श्री. सुभाष सावंत
अनुमोदक श्री. गणेश पगारे
ठराव क्र. ५ सर्वानुमते मंजूर
अशाप्रकारे सभेपुढील विषय मांडून झाले असे सचिव श्री. राहूल वाघमारे यांनी सांगून सर्व सभासदांचे आभार मानले.
तसेच अध्यक्ष श्री सचिन दळवी यांनी पूर्नविकासाच्या (Redevelopment) प्रक्रियेबद्दल काही माहिती/सुचना किंवा सल्ला असल्यास सोसायटीच्या कार्यालईन वेळेत येवून मनमोकळेपणे विचारणा/माहिती दयावी आणि हया प्रक्रियेत सर्व एकत्र येवून सहकार्य करावे असे संबोधीत करुन सर्व सभासदांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.