
सभेचा वृत्तांत, फेब्रुवारी - २०२६
📢 सभेची नोटीस
सिध्दिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित भुखंड क्र.५२, सेक्टर १५, वाशी, नवी मुंबई. या सोसायटीच्या सभासद / सदनिकाधारक यांना सुचित करण्यात येते कि, आपल्या सोसायटीची विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ०१/०२/२०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजता सिध्दिविनायक सोसायटी, वाशी, नवी मुंबई येथे खालील विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी आयोजित केली आहे. तरी सर्व सभासद / सदनिकाधारकांनी वेळेवर उपस्थित राहावे हि विनंती.
सभेपुढिल विषय :
१. सभेसाठी अध्यक्षांची निवड करणे,
२. मागिल सभेचे दिनांक ३०/११/२०२५ रोजीचे इतिवृत्त वाचन करुन मंजूरी देणे.
३. मागिल झालेल्या दिनांक ३०/११/२०२५ रोजी सर्वसाधारण सभेमध्ये पारित केलेल्या ठरावाप्रमाणे कार्यकारिणी कमिटीस पीएमसी (PMC) साठी निविदा मागविण्याचे अधिकार दिलेले होते त्यानुसार कार्यकारीणी कमिटीने पुर्नविकासा करिता (Redevolpment) मागविलेल्या पीएमसी (PMC) यांच्या कोटेशन वर चर्चा करुन पीएमसी (PMC) ची निवड करणे.
४. मा. अध्यक्षांच्या परवानगीने येणा-या इतर विषयांवर चर्चा करुन निर्णय घेणे.
आपले नम्र
सिध्दिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित
सुचना :
१. गणसंख्येअभावी सभा तहकूब झाल्यास, त्याच दिवशी त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर सभा घेण्यात येईल,
२. सभेत फक्त सभासद असलेले सदनिकाधारक उपस्थित राहू शकतील. सभासदांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. सभेत येताना स्वःतचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.
३. परिपत्रक मिळाल्यानंतर काही सुचना असतील त्या दिनांक २८/०१/२०२६ पर्यंत सोसायटी कार्यालयात दयाव्यात.
End of Notice
📝 सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त
उपरोक्त सोसायटीची विशेष सर्वसाधारण सभा दि. ०१/०२/२०२६ रोजी संध्याकाळी ४.३० वा. सोसायटीच्या पटांगणात आयोजित केलेली होती. अपुऱ्या कोरममुळे सभेचे कामकाज संध्याकाळी ५.०० वा. सुरु करण्यात आले. सर्वप्रथम सचिव श्री राहुल वाघमारे यांनी उपस्थित घरमालक सभासदांचे स्वागत केले. त्यानंतर विशेष सर्व सर्वसाधारण सभेच्या काम काजास विषय पत्रिके प्रमाणे सुरुवात करण्यात आली.
- सभेपुढील विषय -
विषय १. सभेसाठी अध्यक्षांची निवड करणे.
श्री. राहुल वाघमारे यांनी विशेष सर्वसाधारण सभेसाठी श्री सचिन दळवी यांनी अध्यक्ष स्थान भूषविणेबाबत सूचविले.
सुचक : श्री. राहुल वाघमारे
अनुमोदक : श्री. विलास वसंत तोरस्कर
श्री. सचिन दळवी यानी अध्यक्ष स्थान स्विकारल्यावर सर्वप्रथम सोसायटी मधील ज्या सभासदांना देवाज्ञा झाली आहे, अश्या खालील घरमालक / सभासद १. कै. डॉ. तुषार महाडिक बी/१०/९/३:१, २. कै. विजया विठ्ठल आमरे बी/१०/७/३:४ ३. कै. श्रीरंग बांदल बी/१०/३/१:२ ४. कै. श्रीमती पटेल यांना श्रध्दांजली देण्याबाबत सूचविले. याप्रमाणे सर्व सभासदांच्या वतीने श्रध्दांजली देण्यात आली.
विषय २. मागील सभेचे दि.३०.११.२०२५ रोजीचे इतिवृत्त वाचन करुन मंजुरी देणे.
मागील दि. ३०.११.२०२५ रोजी इतिवृत्ते घरमालकांना वितरित केलेले होते, त्याच प्रमाणे वॉट्सअॅप द्वारे पाठविले होते. त्या बाबतीत वाचन व माहिती देऊन इतिवृत्तांसह श्री. राहुल वाघमारे यांनी प्रस्तावना केली व त्यानंतर सर्वानुमते इतिवृत्तास मंजुरी देण्यात आली.
सुचक : श्री. दिपक कोळी
अनुमोदक : श्री. गणेश मोडकर
विषय ३. मागील झालेला ३०.११.२०२५ रोजी विशेष सर्वसाधरण सभेमध्ये पारित केलेल्या ठरावा प्रमाणे कार्यकारिणी कमिटीस प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार पीएमसी (PMC) साठी निविदा मागविण्याचे अधिकार दिलेले होते. त्यानुसार कार्यकारिणी कमिटीने पुर्नविकास (Redevelopment) साठी मागविलेल्या कोटेशन वर चर्चा करुन पीएमसी (PMC) ची निवड करणे.
दि.३०.११.२०२५ रोजीच्या सभेत विषय क्र.५ च्या ठरावा प्रमाणे कार्यकारिणी कमिटीला दिलेल्मा अधिकाराप्रमाणे पीएमसी (PMC)_साठी कोटेशन मागविण्याबाबत सुचविले होते. त्याप्रमाणे पीएमसी (PMC) साठी वाशी विकली टाईम्स (Vashi Weekly times) व लोकमत (Lokmat) मध्ये जाहिरात देवुन कोटेशन स्विकारण्याची मुदत १० दिवसांची ठेवण्यात आलेली होती. (TENDER NOTICE FOR PMC) दि. ०६.१२.२०२५ ते १५.१२.२०२५ (त्याचप्रमाणे बिल्डींगच्या प्रवेशद्वारावर नोटीस बोर्ड, ऑफीस बाहेरील नोटीस बोर्ड वर जाहिरात मसूदा प्रदक्षिण केलेला होता. जेणेकरुन सर्वाना त्यांची माहिती मिळून कोणी ईच्छूक असलेल्या व्यक्ति पर्यंत माहिती मिळेल. तसेच दि. ०६.१२.२०२५ रोजी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्ती साठी सर्वसभासदांना परिपत्रकाद्वारे आवाहन करण्यात आलेले होते. त्याच प्रमाणे कार्यकारी मंडळाने दोन्ही गेट, प्रवेशदारावर बोर्ड प्रर्दशित केलेला होता. म्हणजेच इच्छुकांना कोटेशन देता येईल व पारदर्शकपणे प्रक्रिया राबविणे सुलभ होईल असा कमिटीचा हेतु होता. सदरच्या काळावधीत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार पीएमसी (PMC) साठी १६ कोटेशन सिल बंद लिफाफे आलेले होते. सदरची कोटेशन छाननी करतांना ०१ HYPER VOP COM LLP चे कोटेशन धनादेश दिल्याने रद्द करण्यात आले. सदरची उर्वरीत सिल बंद कोटेशन श्री. अभिनव सिंग कायदेशीर सल्लागार (Legal Advisor) व कमिटी मेंबर व अन्य इच्छुक घरमालक / सभासद यांच्या उपस्थितीत उघडण्यात आलेली असून सर्वा समक्ष प्रत्येक कोटेशन सिल बंद असल्याची खात्री करुन व उपस्थितांसमोर उघडण्यात आलेली होती. प्रत्येक कोटेशन मधील दिलेली माहिती /अनुभव केलेल्या कामाचा Experience/ scope of work/Technical Bid and Financial Bid बाबतीत दिलेली माहिती व कोटेशन मध्ये कामकाजाची फी इ. माहिती देवुन तुलनात्मक तक्ता तयार करण्याबाबत निर्णय घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यांनतर श्री. अभिनव सिंग (Legal Advisor) यांनी तुलनात्मक तक्ता तयार करुन कमिटी कडे सुपुर्द केल्यावर सदरची माहिती सोसायटी नोटीस बोर्ड तसेच सुरक्षा केबिन नोटीस बोर्डवर प्रदर्शित करुन त्याबाबत तक्ता वाट्सअॅप पीडीएफ (Whatsapp PDF) द्वारे सर्व घरमालकांना महिती साठी देण्यात आलेला होता व काही सुचना किंवा शंका असल्यास त्या प्रमाणे सोसायटी कार्यालयात लेखी देण्या बाबत सुचित केले होते. काही इच्छुक घरमालक पुर्नविकास कामाची माहिती/कोटेशन पहाण्यासाठी सोसायटी कार्यालयात उपस्थित होते. त्यांनी काही प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) कोटेशन चे फोटो व त्यांचे पत्ते व त्याच प्रमाणे केलेल्या कामाची माहिती मिळविण्याच्या दृष्टीने नेलेले होते. श्री. रविंद्र कुकडे व श्री. पी.पी म्हात्रे, श्री. गंभीर त्याप्रमाणे त्यांनी माहिती मिळविलेली असेलच. कार्यकारी मंडळ सदस्यांनी सुद्धा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार पीएमसी (PMC) साठी काही पीएमसी (PMC) कार्यालयात व साईट (site visit) करुन माहिती मिळविलेली आहे. त्यांची चालु स्थिीतील बांधकामे व पुर्ण झालेली बांधकामे याची माहिती मिळविलेली आहे. त्याबाबतची वस्तु स्थिती श्री. राहुल वाघमारे सचिव यांनी सभेत सभासदांसमोर ठेवली. कायदेशीर सल्लागार व कार्यकारी मंडळ बैठकित सदर बाबत पुर्णतय्या सर्वतुलानात्मक बाबींची माहिती पडताळुन श्री. लिलाधर परब आर्किटेक्ट आणि डिजाईनर पीएमसी (PMC) साठी योग्य वाटत असल्यामुळे सर्वासमोर मान्यते साठी ठेवले. करिता सर्व उपस्थित घरमालक / सभासद यांनी आपले मत मांडावे व त्यास हात उंचावुन मान्यता देण्याबाबत सुचविले. त्यास ९९% सभासदांनी मान्यता देवुन श्री. लिलाधर परब आर्किटेक्ट आणि डिजाईनर यांची पीएमसी (PMC) साठी सर्वानुमते मंजुरी दिलेली आहे. श्री. लिलाधर परब आर्किटेक्ट आणि डिजाईनर (LILADHAR PARAB ARCHITECTS AND . DESIGNERS) यांना पीएमसी (PMC) साठी अपोईटमेंट लेटर देण्याचे सर्वानुमते ठरले.
सुचक : श्री. रविंद्र कुकडे
अनुमोदक : श्री. सुनिल गुप्ता
श्री. लिलाधर परब आर्किटेक्ट आणि डिजाईनर यांनी पीएमसी (PMC) मंजुरी झाल्यावर त्यांच्या कामाचा उरक योग्य वेळेत केला नाही किंवा दिरंगाई झाल्यास त्याबाबत सुचना कारवाई करण्याचे निर्णय कमिटी राखुन ठेवत आहे. त्यानंतर श्री. अभिनव सिंग कायदेशिर सल्लागार यांनी काही सभासदांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरन केले. त्याप्रमाणे पुर्नविकास कामात येणाऱ्या अडचणी बाबतची माहिती सुद्धा सर्वांना दिलेली आहे. त्यानंतर श्री. कुकडे यांनी सोसायटीचे काम डिजीटल पध्दतीने करावयाबाबत सुचविले. सोसायटीने इमेल आयडी, कंम्प्युटर, स्केनर, प्रींटर, सोफटवेअर वापरण्याबाबत सुचना केली. सदर बाबतीत श्री. राहुल वाघमारे, सचिव यांनी सांगितले की सोसायटीला व्यवस्थापक / मॅनेजर नेमणुक करावी लागेल. त्याचप्रमाणे आर्थिक भार सुद्धा सहन करावा लागेल. त्यासाठी सभासदांकडुन वाढीव मेंटेनेन्स चार्जेस वसुली करणे भाग पडेल. त्याबाबत कमिटीला विचार करावा लागेल.
श्री. सुभाष पिसाळ (बी/१०/८/१:४) यांनी सिर्कीग फंड (SINKING FUND) रक्कमेचा वापर करता येईल का अशी विचारणा केली, किंवा घरमालकांना परतावा देता येईल का असा प्रश्न उपस्थित केला त्यावर कायदेशीर सल्लागार श्री. अभियन सिंग यांनी सिकींग फंड कधी वापरता येतो या वर सविस्तर माहिती दिली. सध्यः रिथतीत वापर करता येणार नाही. आपल्या बिल्डींग तयार झाल्यावर त्याबाबद ची तरतूद निर्णय घेण्याबाबत सुचविले.
श्री. रविंद्र कुकडे (बी/१०/४/३:३) यांनी पीएमसी (PMC) व विकासक (DEVELOPER) यांचे समवेत करार झाल्यावर त्याबाबत चा करारनामा रजिस्टर करण्याबाबत सुचविले.
परंतु सोसायटी चे करार नोंदणी केल्यास त्याचा नोंदणी आकार सोसायटीलाच भरावा लागेल याबाबतीत श्री. अभिनव सिंग सल्लागार यांनी रजिस्टर नोंदणी आवश्यक नसल्याचे सुचविले.
तसेच अध्यक्ष श्री. सचिन दळवी यांनी ज्या सभासदांची/घरमालकांची सदनिका (Flat) स्वतःच्या नावावर/हस्तांतर करणे बाकी असेल, त्यांनी लवकरात लवकर नावावर करुन प्रक्रिया पुर्ण करावी जेणेकरुन पुर्नविकासाच्या (Re-development) वेळेस काही अडथळा येणार नाही.
अश्या प्रकारे सर्व विषयावर सादक बादक चर्चा होवुन खेळी मेळीच्या वातावरणात सभेचे कामाकाज पार पडले.
श्री सचिन दळवी अध्यक्ष यांनी सर्व उपस्थित सभासदांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.